प्रतिनिधी मंडळ निवडणुकीचं कवित्त्व

 सामवेदी ब्राह्मण संघ प्रतिनिधी मंडळ निवडणुकीचं कवित्त्व काही दिवस उरेल. 


आपण सर्व विसरून जाऊ. विसरणे हे वरदान आहे. कधी तुम्ही विसरता, परंतु तल्लख बुद्धी वाले विसरता विसरणार  नाहीत. त्यांना तिथेच खितपत राहू दे. 


मती गुंग झालेले बारामती आणतील , नागपूर आणतील. नेमक्या प्रश्नावर बोलता/लिहता येत नाही तेव्हा अश्या गोष्टी मध्ये आणतील. आणू दे त्यांना .  बिच्चारे!


इतिहासा पासून काही शिकत नाही. परंतु एक वाक्य आठवणीत असेल  "बचेंगे तो और भी लढेंगे "  हे ध्यान्यात असणा-यांनी असलेल्या प्रतिनिधींना विवेके मतदान करावे असं आवाहन करणे योग्य की अयोग्य, 

कोण कोणाला शिव्या देतो आहे. 

चुकीच्या ओव्या सुद्धा  शिव्या होतात. 

कार्याचं मूल्यमापन होऊ नये का? इकडेच तर खरी कसोटी असते.

 जैमुनीवर आता कोणी जायला, काम करायला तयार होत नाही असा सूर काढला जातो. जरा विश्लेषण करा !

 दहा वर्षापूर्वी खूप मंडळी जैमुनी संचालक मंडळात जाण्यासाठी उत्सुक असायची. कोणी आणली ही परिस्थिती,काय झालं, कश्यामुळे झालं  विचार कराल की नाही?  काम करण्यायोग्य वातावरण , संस्थेची चांगली पत ठेवण्याची जबाबदारी कोणाची? 

जैमुनींचं भाग्य कोणी पालटवलं. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जबाबदार कोण ? (भाग्यविधाते कोण) 

 

परिवर्तन हा सृष्टीचा नियम. झोपेत ही बदल होत असतात. सजग तेवढे असायला हवं. 

नाहीतर झालेले बदल दिसतच नाहीत, 

पराभवात विजयाचा  अंकुर दिसतो. सामर्थ्यांची झलक दिसते. 

पराजयात  जय असतो. आणि "जय" परावलंबी असेल तर पराजय ठरतो. 

बघा ना , भातशेती कमी झाली. हॉलर, घरघंटी आल्या गिरण्या बंद पडल्या.  जुनाट मशिनरी.हे अजून एक कारण. 

मशनरी काय  , विचार काय काळसापेक्ष असायला हवेत. 

२४ चा धक्का , १ चा धक्का, हो ना !!  धक्के मारायचे, साळसूद पणाचा आव आणायचा सहकार्यासाठी मगरीचे अश्रू आणायचे. . 

रडत राऊ  व्हायचं कि काळा बरोबर कामाला गती द्यायची. 

काळ काम आणि वेग याचं गणित जुळु दे  ही शुभेच्छा !!



 जय सामवेद.

Comments

Popular posts from this blog

व्यक्तींचिंतन

पाय मातीचे .... डोकं .....